आमदार विश्वजीत कदम यांची ठाम भूमिका

आमदार विश्वजीत कदम यांची ठाम भूमिका

सांगली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्य पदी आमदार विश्वजीत कदम यांची ३० मार्च २०२४ रोजी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचे आमदार कदम यांनी आभार मानले. सांगलीच्या लोकसभेच्या  जागेचा तिढा सुटत नसल्याने विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवले. या पत्रात काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्य पदी निवड आणि काँग्रेस पक्षाच्या सांगली लोकसभेच्या जागेवर त्यांनी भाष्य केले आहे. सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला येणार नसल्याचा पवित्रा आमदार कदम यांनी घेतला आहे. सांगलीच्या जागेवर आमदार विश्वजीत कदम यांची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version