मुंबई, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी आदेश दिला तर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे संकेत नारायण राणे यांनी दिले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मागील काही दिवसांपासून नारायण राणे यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भेटीगाठींचे प्रमाण वाढवले आहे. यामुळे ते निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ‘आपलं ठरलंय नारायण राणे, आपला माणूस, आपला खासदार’ अशा आशयाचे स्टेटस राणेंच्या समर्थकांनी व्हॉट्सअॅपवर ठेवले आहेत. यामुळे राणे निवडणूक लढवणार या चर्चेला उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.