अनंतनाग, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या पक्षाकडून गुलाम नबी आझाद अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सकडून या जागेवर मियां अल्ताफ उभे आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षापासून फारकत घेतल्यानंतर २०२२ मध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीची स्थापना केली. हा पक्ष जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीकडून उधमपूर-डोडा लोकसभा मतदारसंघामधून जीएम सरूरी निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने लोकसभेसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.