पुणे, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातलगांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी नातलग करत आहेत. रुग्णालय प्रशासनाने आरोपांची दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली आहे.
रुग्ण १६ तारखेला रुग्णालयात भरती झाला. दारूच्या अती सेवनाने त्याचे पाय निकामी झाले. रुग्ण २९ तारखेपासून व्हेंटिलेटरवर होता. रुग्णाला उंदीर चावल्याची तक्रार नातलगांनी १ सोमवार एप्रिल रोजी केली. पण रुग्णाच्या मृत्यूचा आणि या घटनेचा लगेच संबंध जोडणे योग्य नाही. चौकशीतून सत्य कळेल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.