अरुणाचलमध्ये भाजपाची विजयाने सुरुवात

अरुणाचलमध्ये भाजपाची विजयाने सुरुवात

इटानगर, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या ६० जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि भाजपाने विजयाने शुभारंभ केला. अरुणाचलच्या विधानसभेच्या ६० पैकी १० जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय झाला. विजयी उमेदवारांमध्ये अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना मेन यांचा समावेश आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
भाजपाचे १० उमेदवार बिनविरोध विजयी

१ पेमा खांडू, मुक्तो
२ चौना मेन, चौखाम
३ रातू टेची, सागली
४ जिक्के टाको, ताली
५ न्यातो दुकम, तलिहा
६ मुच्छू मिठी, रोइंग
७ हागे अप्पा, झिरो-हापोली
८ टेची कासो, इटानगर
९ डोंगरू सिओंगजू, बोमडिला
१० दसंगलू पुल, हयुलियांग

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. याआधी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपाने अरुणाचलच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. यंदा या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल पण विधानसभेसाठी दहा जणांचा बिनविरोध विजय झाला आहे. यामुळे भाजपाच्या विजयाचा शुभारंभ पुन्हा एकदा अरुणाचलमधून झाल्याची प्रतिक्रिया पेमा खांडू यांनी दिली. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जनतेचा विश्वास आहे. या विश्वासामुळेच भाजपाने मतदानाआधीच विजयाचा शुभारंभ केल्याचे ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version