उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन

सातारा, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीचा सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पण उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन झाले आहे. यामुळे साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या तिकिटावर उदयनराजे यांना उमेदवारी मिळण्यातील अडथळा दूर झाल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजे सध्या सातारा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. यामुळे त्यांचा पाठिंबा तिकिटासाठी उदयनराजे यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता. यासाठी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. यासाठी शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य उदयनराजे यांनी साधले. शिवेंद्रराजेंना भेटून उदयनराजे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने झालेल्या चर्चेअंती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version