मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आणखी काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय जाहीर करू, असे तटकरे म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. याच कारणामुळे नाशिकचा उमेदवार जाहीर केलेला नाही, असे तटकरे यांनी सांगितले.
परभणी लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत
महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संजय जाधव, शिउबाठा विरुद्ध हरिभाऊ शेळके, ओबीसी बहुजन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.