उदयनराजे साताऱ्यातून, जानकर परभणीतून, परदेशी धाराशिवमधून ?

उदयनराजे साताऱ्यातून, जानकर परभणीतून, परदेशी धाराशिवमधून ?

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महादेव जानकर सोमवारी एक एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. जानकर उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनीच दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version