लखनऊ, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : उत्तर प्रदेशच्या बांदा वैद्यकीय महाविद्यालयात गुंड मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. मुख्तार अन्सारीवर तुरुंगात विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय त्याच्या नातलगांनी केला आहे. हा संशय व्यक्त झाल्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले.
बांदा येथील न्यायदंडाधिकारी भगवान दास गुप्ता यांनी मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. मुख्तार अन्सारीच्या तब्येतीबाबतचे अहवाल, मुख्तार अन्सारीवर सुरू असलेले उपचार आणि उपचार सुरू असताना त्याच्या शरीराने दिलेला प्रतिसाद याबाबतची माहिती तीन दिवसांत चौकशी समितीला सादर करा, असे आदेश शासनाने तुरुंग प्रशासनाला आणि बांदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिले आहेत. चौकशी समिती त्यांचा अहवाल एक महिन्यात सादर करणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.