मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचितने तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केला आणि तिसरी आघाडी प्रत्यक्षात आली तर भाजपाचा फायदा होईल. मैत्रीपूर्ण लढती आणि तिसरी आघाडी हे दोन्ही भाजपासाठी फायद्याचे ठरू शकते, असे शिउबाठाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले. मविआच्या बैठकांमध्ये शिउबाठाने फक्त त्याच जागांवर दावा केला ज्या २०१९ मध्ये लढवल्या होत्या, असे संजय राऊत म्हणाले. वंचितने असे करू नये ज्याने भाजपाला फायदा होईल, असेही संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.