गोविंदा वायव्य मुंबईतून शिवसेनेचा उमेदवार ?

गोविंदा वायव्य मुंबईतून शिवसेनेचा उमेदवार ?

मुंबई, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते शिवसेनेच्या तिकिटावर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर खान या दोघी पण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. करिश्मा आणि करिना या दोघी शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण खासदार झाल्यानंतर गोविंदा संसदेत कमी वेळा दिसले. ते मतदारसंघात संपर्कासाठी उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पण करू लागले. अखेर २००८ मध्ये काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले. यानंतर गोविंदा यांनी राजकारण सोडले. आता शिवसेनेच्या माध्यमातून गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version