रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द

रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द

नागपूर, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वे यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. निवडणूक आयोग रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने रश्मी बर्वे यांना दिलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव आहे. रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद झाल्यास श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील. महायुतीकडून शिवसेना रामटकेची जागा लढवत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे उभे आहेत. यामुळे राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

छाननीत जात प्रमाणपत्र रद्द

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जात प्रमाणपत्र छाननी समितीने रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले.

पुनर्विचार करण्याची विनंती

काँग्रेसने रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात निर्णय अद्याप आलेला नाही. पुनर्विचारात रश्मी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द झाले तर श्यामकुमार बर्वे निवडणूक रिंगणात असतील. पण रश्मी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द झाले नाही तर त्या स्वतःच निवडणूक लढवतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version