मुंबई, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : मविआचे घटक आघाडी धर्म पाळत नसल्याचे वक्तव्य करत राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांच्या विषयीची त्यांची नाराजी जाहीर केली. शिउबाठा राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे उमेदवार जाहीर केले. सांगलीवर काँग्रेस आणि ईशान्य मुंबईवर राशप दावा सांगत असूनही शिउबाठाने या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले. यामुळे काँग्रेस आणि राशपमध्ये शिउबाठाविषयी प्रचंड नाराजी आहे. ईशान्य मुंबईत राशपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शिउबाठाविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या सांगलीतील नेत्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी थेट दिल्ली गाठली.
‘मविआचे घटक आघाडी धर्म पाळत नाहीत’
शरद पवार यांची उद्धव यांच्याबाबत नाराजी
राशपच्या बैठकीतून विश्वसनीय वृत्त
ईशान्य मुंबई उमेदवार घोषणेमुळे राशप नाराज
शरद पवार समर्थकांकडून उद्धव यांच्याविरोधात घोषणाबाजी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.