नवनीत राणा भाजपाकडून लढणार

नवनीत राणा भाजपाकडून लढणार

नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा लोकसभेची २०२४ ची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत. नवनीत राणा यांना भाजपाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. थोड्याच वेळात नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याचे प्रसिद्धीपत्रक भाजपाकडून काढण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे अशी चुरस बघायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची सातवी यादी जाहीर
महाराष्ट्रातील अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी
कर्नाटकमधील चित्रदुर्गमधून गोविंद करजोल यांना उमेदवारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version