राणेंना केसरकरांचा पाठिंबा

राणेंना केसरकरांचा पाठिंबा

सिंधुदुर्ग, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे निवडणूक लढवणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी दिले आहेत. राणेंची केंद्रात पुन्हा मंत्री होण्याची क्षमता आहे, असेही केसरकर म्हणाले.

सध्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. पण अद्याप शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर केसरकर यांचे हे वक्तव्य आले आहे.

कोणाला उमेदवारी द्यावी याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. किरण सामंत यांना उमेदवारी दिली तरी विजय महायुतीचाच होईल, असाही विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

नारायण राणे राज्यसभेवर खासदार होते. केंद्रात मंत्री होण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा संसदेत खासदार म्हणून प्रवेश करावा लागणार आहे. यासाठी नारायण राणे निवडणूक लढवणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. राणेंची केंद्रात पुन्हा मंत्री होण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version