पुणे, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटील मंगळवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.अशातच राशपचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ट्विटर या समाजमाध्यमाद्वारे टीका केली आहे. गद्दरीचा महामेरू..! आज एवढे सिनियर गद्दार येताय म्हटल्यावर यांचा इतिहास पाहता मिलिंदा गँगमधील ज्युनिअर गद्दारांमध्ये भीतीचे वातावरण आहे असे ट्विट करत त्यांनी आढळराव यांच्यावर निशाणा साधला आहे.
राशपचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये आढळरावांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या गोष्टींचा पाढा वाचला आहे. त्या व्हिडिओमध्ये गद्दार कोण असं म्हणत आढळरावांवर टीकास्त्र सोडलं आहे पण राशपने एखाद्या वर बोलताना गद्दार हा शब्द वापरणे हस्यास्पद आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.