पुणे, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. संघमवाडीतील बोट क्लब येथे ही बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुक येऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभेसाठी ५ जागा लढवण्यावर ठाम आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या याद्या जाहीर होताना दिसत आहेत. त्यामुळे बैठकीत लोकसभा उमेदवार निवडीबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर अजित पवार लोकसभा निवडणूकसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.