दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई

दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई

पुणे, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : विनापरवाना वाहन चालविणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूलिवंदन सणानिमित्त २५ मार्च रोजी तुकाई नगर सर्कल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी श्रावण शेवाळे यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पालकांविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोन्ही दुचाकी जप्त केल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version