पूजाची लग्नानंतरची पहिली धूळवड

पूजाची लग्नानंतरची पहिली धूळवड

मुंबई, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : अभिनेत्री पूजा सावंत हिने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाण सोबत लग्न केले. या लग्नानंतरची पहिली धूळवड पूजा आणि सिद्धेश ऑस्ट्रेलियात साजरी करत आहेत. या सेलिब्रेशनचे निवडक फोटो पूजाने समाजमाध्यमावर शेअर केले आहेत.

पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण सध्या कामानिमित्तानं ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळं पूजा देखील काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. यंदाची होळी आणि धूळवड दोघांनी तिथेच साजरी केली. लग्नानंतरचा पूजाचा हा पहिलाच सण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version