उत्तर मध्य मुंबईतून कोण लढणार ?

उत्तर मध्य मुंबईतून कोण लढणार ?

मुंबई, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापर्यंत पाच याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांच्या माध्यमातून भाजपाने महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २५ जागा लढवून २३ ठिकाणी विजय मिळवला होता. यंदा २३ जागांवरील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपाने अद्याप उत्तर मध्य मुंबई आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघांमधून कोण लढणार हे जाहीर केलेले नाही. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने या दोन्ही जागा लढवल्या होत्या. यामुळे यंदा उत्तर मध्य मुंबई आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघांमधून कोण लढणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : संभाव्य उमेदवार : १. पूनम महाजन २. आशिष शेलार
सातारा लोकसभा मतदारसंघ : संभाव्य उमेदवार : १. उदयनराजे भोसले २. श्रीनिवास पाटील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version