नागपूर, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसमध्ये झुंडशाही आणि हुकुमशाही सुरू आहे. या प्रकाराला त्रासल्यामुळेच पक्ष सोडला, असे आमदार राजू पारवे म्हणाले. राजू पारवेंच्या निर्णयामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. काँग्रेसचा आमदार शिवसेनेत गेला. महायुती सरकारच्या काळात विकासाला गती मिळाली आहे. अनेक विकासकामं झाली आहेत आणि होत आहेत. याच कारणामुळे विकासाकरिता महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेत राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून पारवेंनी भगवा झेंडा हाती घेतला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.