महायुतीची उमेदवार यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता

महायुतीची उमेदवार यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता

मुंबई, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीची रविवारी रात्री महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती असणार आहेत. मुंबईत अंतिम चर्चा होईल. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला ७ ते ८ जागा मिळणार आहेत. रविवारी रात्री ही यादी दिल्लीला जाणार आहेत आणि सोमवारपर्यंत लोकसभेसाठी उमेदवार जाहीर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version