नागपूर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीत ६ ते ७ जागांवर तिढा आहे. हा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अमरावतीची जागा भाजपाच लढवणार असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २५ जागांवर भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. यामुळे यंदा भाजपा किमान २५ जागा निश्चित लढवणार असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत भाजपाने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुढील यादी होळीआधी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. यामुळे होळीआधी भाजपाच्या राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता वाढली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.