मुहूर्त ठरला आढळराव पाटील राष्ट्रवादीत

मुहूर्त ठरला आढळराव पाटील राष्ट्रवादीत

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघतील आमदार उपस्थित होते. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा अनुषंगाने ही बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती होती पण राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर आढळराव पाटीलांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या नावावर शिक्कमोर्तब करत शिरूरमधून आम्ही मोठ्य़ा विजयी होणार असल्याची ग्वाही दिली. यावरून आढळरावांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे समजले.

कोण आहेत आढळराव पाटील?

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेच्या तिकीटावर शिरूर मतदारसंघातून तीन वेळा लोकसभा निवडणूक लढले आहेत.२०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा लढले आणि विजयी झाले. २०१६ मध्ये संसद रत्न या संसदेतील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. शिरूर मतदारसंघात तीन टर्म खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.  

शिरूरमध्ये कोणाचे पारडे जड

पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून राशपचे खासदार अमोल कोल्हे कार्यरत आहेत. अमोल कोल्हे हे चित्रपट अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कोल्हेंना कलाकार म्हणून लोकांचे प्रेमही अधिक मिळत आहे. तसेच खासदार म्हणून त्यांचे कामही उत्कृष्ट आहे. त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरव देखील करण्यात आला आहे. यामुळे शिरूर मतदारसंघातील शरद पवार यांची बाजू अजित पवारांच्या तुलनेत वरचढ होती. त्यामुळे अजित पवार यांना शिरूरमधून तगडा उमेदवार देणे गरजेचे होते. अशातच आढळरावांच्या पक्ष प्रवेशामुळे हा प्रश्न मिटणार आहे. आता लोकसभा निवडणुकीची प्रतिक्षा आहे. शिरूर मतदारसंघातून कोल्हे आणि आढळराव लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघात कोणाचे पारडे जड होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version