भाजपा – राष्ट्रवादी मतदारसंघांची अदलाबदली करणार ?

भाजपा – राष्ट्रवादी मतदारसंघांची अदलाबदली करणार ?

माढा, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सातारा आणि माढा यो दोन लोकसभा मतदारसंघांची अदलाबादली करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपाने माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करण्यास रामराजे निंबाळकर यांनीही असमर्थता दर्शवल्याचे वृत्त आहे. यामुळे भाजपा – राष्ट्रवादी मतदारसंघांची अदलाबदली करण्याचा विचार करत आहेत.

भाजपा माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोपवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार करत आहे. या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची साताऱ्याची जागा भाजपाला देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. अदलाबदली झाली तर माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहील आणि साताऱ्यातून भाजपाच्या तिकिटावर उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version