शिउबाठा आणि काँग्रेसमधला तणाव वाढला

शिउबाठा आणि काँग्रेसमधला तणाव वाढला

सांगली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गुरूवारी शिउबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला शिउबाठा गटाकडून काँग्रेसलाही निमंत्रण देण्यात आलं होत. मात्र काँग्रेसने हे निमंत्रण नाकारून मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे. कारण लोकसभेच्या जागेवरून शिउबाठा आणि काँग्रेस यांच्यात तणाव वाढत चालला आहे. 

लोकसभेच्या जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी मांडली आहे. मात्र राशपने निमंत्रण स्वीकारले असून राशपचे कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version