आदित्यना शोधण्याचे भाजपाचे आवाहन

आदित्यना शोधण्याचे भाजपाचे आवाहन

मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : ‘बाळराजे बसले कुठे दडून ?, मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा, बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा !’ असा प्रश्न भाजपाच्या प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. हाच मुद्दा उपस्थित करत प्रसाद लाड यांनी ते आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपाचे नेते, पदाधिकारी उद्धव यांना राजे आणि आदित्य यांना बाळराजे असे अनेकदा उपरोधाने म्हणतात. आता प्रसाद लाड यांनी थेट बाळराजेंचा उल्लेख प्रश्न उपस्थित करणारे ट्वीट केले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणातील संशयितांमधून नाव वगळण्याची विनंती यावेळी करण्यात आली. ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाल्याचे वृत्त आहे. शिउबाठाकडून प्रसाद लाड यांच्या ट्वीटला अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version