माढ्याचा तिढा फडणवीसांच्या दरबारी

माढ्याचा तिढा फडणवीसांच्या दरबारी

माढा, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. माढामधून दुसऱ्या यादीमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात आली. माढा मतदारसंघांमधून दुसऱ्यांदा निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाल्याचे दिसून आले. मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी जाणून घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. तर दुसरीकडे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची चर्चा सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version