नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवार संध्याकाळपासून दिल्लीत आहेत. त्यांनी विनोद तावडे आणि अमित शाह या दोन नेत्यांशी चर्चा केली. अमित शाह आणि राज यांची मंगळवारी दुपारी चर्चा झाली. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दिल्लीत राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेत असताना मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धाव घेतली. सागर बंगल्यावर अजित पवार भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी चर्चा करत आहेत. संध्याकाळी अजित पवार भाजपाच्या नेत्यांसोबत दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.