कुठलंही अल्टिमेटम वंचितला नाही मोकळेंची प्रतिक्रिया

कुठलंही अल्टिमेटम वंचितला नाही मोकळेंची प्रतिक्रिया

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा निर्णय कळवा आमचं ठरलं आहे असं सांगत महाविकास आघाडीने वंचितला अल्टिमेटम दिला असल्याचे वृत्त खोटे असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. महाविकास आघडीसोबत अशा प्रकारची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये ही खोटी बातमी पसरवत असणारा सूत्र कोण आहे. त्याला ऑन कॅमेरा बोलायला सांगावे आणि मगच या बातम्या चालवाव्यात. तसेच या बातमीत काहीही तथ्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version