‘अजित पवार चक्रव्यूह भेदतील’

‘अजित पवार चक्रव्यूह भेदतील’

अकोला, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याकरिता पवार कुटुंबातील अनेक सदस्य मैदानात उतरले आहेत. पण कुटुंबातील सदस्यांनी तयार केलेला हा चक्रव्यूह अजित पवार भेदतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. राजकारणात एखाद्याची कोंडी करण्यासाठी घरातल्यांना एकमेकांविरोधात उभे करणे ही वरिष्ठ नेत्यांची जुनी पद्धत आहे; असे कोणाचेही नाव न घेता मिटकरी म्हणाले. याआधी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार , त्यांच्या पत्नी शर्मिला श्रीनिवास पवार , त्यांचा मुलगा युगेंद्र पवार, आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, राजेंद्र पवारांच्या पत्नी सुनंदा पवार, त्यांची मुलगी सई पवार, शरद पवार ही सर्व मंडळी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली. सुप्रिया सुळे या उमेदवार म्हणून स्वतःचा प्रचार करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार वगळता पवार कुटुंबातील इतर सदस्यांचा भर सुप्रिया यांच्यासाठी प्रचाराचे रील्स करण्यावर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version