बीडमध्ये राशप उमेदवार आयात करणार ?

बीडमध्ये राशप उमेदवार आयात करणार ?

बीड, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंकजा यांचा जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव याचा विचार करून राशपने बीडमध्ये सक्षम महिला उमेदवार उभा करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. ताकदीचा उमेदवार उभा करण्यासाठी राशप बाहेरून उमेदवार आयात करणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती मेटे बीडमध्ये निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पण ही जागा भाजपाकडे असल्यामुळे त्या पक्षांतर करून राशपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राशपचे नेते आणि ज्योती मेटे यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version