लोकसभा निवडणूक लढवणार नाही – एकनाथ खडसे

लोकसभा निवडणूक लढवणार नाही – एकनाथ खडसे

जळगाव, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी – प्रकृतीच्या कारणामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. रावेरमधून महाविकासआघाडी कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता वाढली आहे.

देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपाने आतापर्यंत १०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अनेपक्षित नावांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव मधील रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाने पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version