तिसऱ्या यादीत सातपुतेंच्या नावाची शक्यता

तिसऱ्या यादीत सातपुतेंच्या नावाची शक्यता

सोलापूर, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय निवडणुक आयोगाने नुकतीच शनिवारी निवडणुकांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून भाजपा आमदार राम सातपुते यांना संधी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. सोलापूर मतदारसंघातून भाजपाने युवा चेहऱ्याला संधी देण्याचे ठरवले आहे. असे दिसून येतं आहे. कारण भाजपा प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येते. सातपुतेंना पक्षाने कामाला लागण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत. भाजपाच्या तिसऱ्या यादीमध्ये राम सातपुतेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत राम सातपुते ?

राम सातपुते हे भाजपाकडून आमदारकीला निवडून आले आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहेत. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते आमदार असा सातपुते यांचा प्रवास आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version