पुण्यात संशयित दहशतवाद्यांविरोधात एनआयएची कारवाई

पुण्यात संशयित दहशतवाद्यांविरोधात एनआयएची कारवाई

पुणे, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : संशयित दहशतवाद्यांविरोधात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. संशयित असलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एकूण 4 मालमत्ता एनआयए कडून जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट देखील एनआयए कडून जप्त केला आहे. एनआयए कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयए कडून सुरू आहे.

दरम्यान, सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version