शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची जोरदार तयारी चालू झाली आहे. लोकसभेच्या जागांसाठी भाजप आणि शिवसेना यांची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा नेते राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईत लोकसभेसाठी तयारी चालू केली आहे. अशातच दक्षिण मुंबईतील दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी सह्या करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे शिवसैनिकांनी दक्षिण मुंबईत शिवसेनेचा उमेदवार द्या अशी मागणी केली आहे.

यावरून शिवसैनिकांना दक्षिण मुंबईतील जागा हवी असल्याचे दिसून येत आहे. आधीच शिवसेना आणि भाजपामध्ये ठाणे आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. आता दक्षिण मुंबईतील लोकसभेची जागा भाजपा की शिवसेनेला मिळेल याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version