आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जरांगे घेणार पत्रकार परिषद

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जरांगे घेणार पत्रकार परिषद

जालना, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने सगेसोयरेच्या आदेश कायद्यात अंमलबजावणी करावी. जर अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांनी काय करावे या अनुषंगाने जरांगे पाटील ही पत्रकार परिषद घेणार आहेत.

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जरांगे मराठा समाजाला काय आव्हान करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version