युवा स्वाभिमान कार्यकर्ता मेळावा

युवा स्वाभिमान कार्यकर्ता मेळावा

अमरावती, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा अयोजित करण्यात आला आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात सायंकाळी ५ वाजता युवा स्वाभिमानचा मेळावा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मोठा निर्णय घेणार.. दिशा ठरणार’ अशा प्रकारचे फलक अमरावतीत लावण्यात आले आहेत. मेळाव्याला नवनीत राणा व रवी राणा मार्गदर्शन करणार आहेत.

खासदार नवनीत राणा ह्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. आज त्या पक्षाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राणा दाम्पत्य आज मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version