पाण्यासाठी अनुदान देण्याची दानवेंची मागणी

पाण्यासाठी अनुदान देण्याची दानवेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेत महापालिकेचा हिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपये कर्ज देण्याचे आश्वासन महापालिकेला दिले. मात्र हे ८२२ कोटींचे कर्ज फेडताना महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अजूनच बिकट होईल, त्यामुळे सरकारने कर्ज न देता अनुदान स्वरूपात हा निधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने शहराच्या पाण्याच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून मार्गी लावला पाहिजे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version