दोन निवडणूक आयुक्तांची घोषणा

दोन निवडणूक आयुक्तांची घोषणा

नवी दिल्ली, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या दोन रिक्त पदांसाठी नव्या निवडणूक आयुक्तांची निवड झाली आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाल्याचे काँग्रेसच्या अधीररंजन चौधरी यांनी सांगितले.

निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे या वर्षी फेब्रुवारीत निवृत्त झाले तर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला. यामुळे निवडणूक आयोगावर फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार कार्यरत आहेत. देशाच्या निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असे तीन जण कार्यरत असतात. यातील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पण दोन्ही निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. या पदांसाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला प्रमुख विरोधी पक्षाचे नेते या नात्याने काँग्रेसचे अधीररंजन चौधरी उपस्थित होते. त्यांनी बैठकीनंतर निर्णयाची माहिती दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगात नव्या नेमणुका
ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version