भाजपाकडून उमेदवारी, शिउबाठाला धक्का

भाजपाकडून उमेदवारी, शिउबाठाला धक्का

नवी दिल्ली, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने कलाबेन मोहन डेलकर यांना उमेदवारी जाहीर केली. हा उद्धव गटासाठी धक्का आहे. मोहन डेलकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कलाबेन यांनी उद्धव यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण लोकसभा निवडणूक २०२४ साठी कलाबेन मोहन डेलकर यांनी भाजपाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत कलाबेन मोहन डेलकर यांचे नाव आहे.

दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. याआधी सहा वेळा निवडून आलेले मोहन डेलकर २०१४ मध्ये हरले होते. यानंतर त्यांनी भाजपातून बाहेर पडून २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. खासदार मोहन डेलकरांचा २०२१ मध्ये मृत्यू झाला. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कलाबेन मोहन डेलकर उद्धव यांच्या पक्षाकडून लढल्या. त्यांनी भाजपाच्या महेश गावितांचा ५१ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version