हरियाणा सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

हरियाणा सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

चंडीगढ, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने हरियाणात सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. नायब सिंग सैनी हे हरियाणाचे नवे आणि ११ वे मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री सैनी यांनी आज विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले.

हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. सैनी यांनी सभागृहात माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कामाचे कौतुक केले. मनोहर लाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारची विचारसरणी प्रामाणिक होती, असं सैनी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version