अजय कपूर यांचा भाजपात प्रवेश

अजय कपूर यांचा भाजपात प्रवेश

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कानपूरच्या राजकारणातील मोठा चेहरा समजले जाणारे माजी आमदार अजय कपूर यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. कपूर यांनी पक्षाचा राजीमाना दिला असून त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे अजय कपूर यांची गणना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये होते. अशा स्थितीत त्यांनी काँग्रेस सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अजय कपूर यांनी त्यांच्या ट्विटर वरूनही काँग्रेस हे नाव हटवले आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि बिहारचे सहप्रभारी म्हणून काम केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version