पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश

पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त महाराष्ट्रात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचा हात हाती धरला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करुन राज्यसभेवर गेलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवींनी पक्षप्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version