राहुल नंदुबारमध्ये असताना काँग्रेसला भगदाड

राहुल नंदुबारमध्ये असताना काँग्रेसला भगदाड

नंदुरबार, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच जिल्ह्यातील बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला असून बुधवारी ते भाजपात प्रवेश करणार आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. बुधवारीपासून नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. एकीकडे राहुल गांधींची यात्रा नंदुरबारमध्ये प्रवेश करत असतानाच जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात असताना माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पद्माकर वळवी यांनी बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. गुरुवारी ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. राहुल गांधी यांची यात्रा नंदुबारमध्ये येताच बड्या नेत्याने साथ सोडल्याने काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील काँग्रेसचे ब़डे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांची मुलगी सिमा वळवीही राजकारणात सक्रिय झाल्या असून त्या जिल्हा परिषदेवर कार्यरत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version