चंडीगढ – लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. भाजपा आणि जेजेपी यांच्यात जागावाटपाच्या चर्चेवरून झालेल्या मतभेदानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मनोहरलाल खट्टर आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून भाजपा आणि जेजेपी यांच्यातील युती तुटली आहे. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत समाधानकारक पर्याय न निघाल्याने दोन्ही पक्षांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्या होत्या. मात्र, बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. तर जनता जननायक पार्टीला १० जागांवर विजय मिळाला. त्यानंतर भाजपने जेजेपीसोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.