महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम

महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम

प्रतिनिधी , मुंबई , १२ मार्च २०२४ : महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपा किमान ३० ते ३२ जागा लढविण्यावर ठाम असून शिवसेनेला १२ ते १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ ते ५ जागा देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा असल्याने जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीला जाणार होते. मात्र भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नवी दिल्लीत सोमवारी होणारी बैठक रद्द झाली. महायुतीची बैठक येत्या 2 ते 3 दिवसात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा येथील जागांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version