मराठी गाण्याची सर हिंदी व्हर्जनला नाही…

मराठी गाण्याची सर हिंदी व्हर्जनला नाही…

मुंबई , ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटातील अत्यंत गाजलेलं गाणं ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्याचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. डॉल्बी वाल्या , वाट दिसू दे , बेबी ब्रिंग इट ऑन या गाण्यांवर तर संपूर्ण महाराष्ट्र ताल धरायचा . डॉल्बी वाल्या आणि ब्रिंग इट ऑन ही दोन गाणी प्रत्येक कार्यक्रमात लावली जात असत .आता ह्या ब्रिंग इट ऑन गाण्याचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, पण काही नेटिझन्स त्याचा ट्रोल करत आहेत.

‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्याचे हिंदी व्हर्जन हे नवीनच प्रदर्शित होणाऱ्या मडगाव एक्सप्रेस या चित्रपटात वापरण्यात आले आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी यामधील ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे, तर यामध्ये नोरा फतेही, दिव्येंदु, अविनाश यांनी डान्स केला आहे. तसेच मराठी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदम यांची झलक देखील गाण्यात दिसते.

परंतु , या गाण्याच्या हिंदी व्हर्जनला नेटिझन्सनी टीका केल्या आहेत . एका नेटीझनने गाण्याला कमेंट केली, “चांगल्या गाण्याची वाट लावली” तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “कायपण म्हणा मराठी गाण्याची सर या गाण्याला नाही”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version