‘फडणवीसांमुळे मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार’

‘फडणवीसांमुळे मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार’

मुंबई, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. यावरती बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या पण तसे होत नाही. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल.

गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी दिलाय. गेवराई येथे आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version