‘कायदा – सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरू’

‘कायदा – सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरू’

पुणे, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात कोयता गँगची दहशत बघायला मिळते. कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते. तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात. त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुफडा साफ करणार, असं आश्वासन दिलं आहे. “कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. “कोयता गँगचा सुफडा साफ करणार”, असंही आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. “कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. असं अजित पवार बेधडकपणे म्हणाले.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार काय म्हणाले?

‘आम्ही कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न करतोय. मी जाहीरपणे सांगतो. आम्ही आजच पोलीस आयुक्तांना पुन्हा सांगितलं आहे. कोयता गँग कोयता गँग, कसली रे कोयता गँग? या कोयता गँगवाल्यांचा तर सुफडा साफच करुन टाकणार आहे. या गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं कुणीही, कितीही मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्या मुलाहीजा ठेवला जाणार नाही. म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो. असं अजित पवार म्हणाले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version